Monday, June 23, 2025
Home मराठी मृण्मयी देशपांडेच्या फोटोवर भाळले चाहते; करतायत थेट बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीशी तुलना

मृण्मयी देशपांडेच्या फोटोवर भाळले चाहते; करतायत थेट बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीशी तुलना

साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील तिचे ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे, तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते. अशातच तिचे काही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा एक ग्लॅमरस ड्रेस घातलेला आहे. तसेच ड्रेसला साजेसा असा मेकअप केला आहे. कानात छोटेसे इअरिंग घातले आहेत. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लूक ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ या शोमधील आहे. ज्यामध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. (Marathi actress mrunmayee deshpande’s glamorous photo viral on social media)

मृण्मयीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांना तिचा हा ड्रेस खूप आवडला आहे. अशातच एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “अगदी राणी मुखर्जीसारखी दिसते.” तसेच इतर चाहते देखील तिचे कौतुक करत आहेत.

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या कारकिर्दीमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. यात ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘छत्रीवाली’ या मालिकेत देखील काम केले आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिची ‘सोप्प नसतं काही’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! ‘या’ दोन मराठमोळ्या अभिनेत्री आहेत बहिणी, फोटो शेअर करून एकीने दिली माहिती

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

हे देखील वाचा