हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी सिने जगत प्रत्येकालाच मनोरंजन जगतातील आपल्या आवडत्या कलाकराबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. या कलाकारांचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, जे त्यांच्या चाहत्यांनाही ओळखणे कठीण जाते. सध्या मराठी सिने जगतातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बालपणीचा गोंडस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु या फोटोमधील अभिनेत्री नक्की कोण? हे मात्र तिच्या चाहत्यांनाही ओळखणे कठीण होऊन बसले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण, आणि कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते.सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात, ज्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या बाबांच्या मांडीवर बसलेल्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील अभिनेत्री दुसरी कोणी नसून आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या मुक्ता बर्वेचा आहे. परंतु मुक्ताचा बालपणीचा हा क्यूट फोटो ओळखणे तिच्या चाहत्यांनाही कठीण झाले आहे.
हा व्हायरल फोटो अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हायरल फोटोमध्ये बाबांच्या मांडीवर बसलेली मुक्ता खूपच गोंंडस दिसत आहे. मुक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तत्पुर्वी अभिनेत्री मुक्ता बर्वेने मराठी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुक्ताचा वाय हा बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. ज्यामधील तिच्या सहजसुंदर अभिनयाचे आणि कणखर भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री मुक्ता बर्वेने आपल्या सिने जगतातील यशस्वी प्रवास प्रचंड संघर्षमय परिस्थितीत पुर्ण केला आहे. अभिनेत्रीचे वडिल एका टेलिकॉम कंपनीत कामाला होते, तर आई शिक्षिका होती. घरातून अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मुक्ताने आपल्या अभिनयाची छाप सिने जगतात पाडली. आपल्या अभिनय कारकिर्दित अनेक चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही तिने दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा-
- ‘आश्रम’पूर्वी रिलीझ झालेली एमएक्स प्लेअरवरील ‘ही’ वेबसीरिज एकट्यातच पाहा, नुसता बोल्डनेसचा कहर
- ‘आता माझ लग्न झालंय व्यवस्थित बोल…’ चाहत्याच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे संतापली दीपिका पदुकोण
- ‘तू इतकी सेक्सी का आहेस?’, अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या फोटोंवरील चाहत्याची कमेंट वेधतेय लक्ष