मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ज्यामध्ये काही दिवसांपूर्वीच टिव्ही अभिनेत्री ऋता दुर्गुळेनेही अचानक लग्न करत चाहत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर टिव्ही अभिनेता विराजस कुलकर्णीनेही शिवानी रंगोळेसोबत लग्नगाठ बांधली. आता आणखी एका अभिनेत्रीने गुपचुप लग्न करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच नेहा जोशी. नेहा जोशीने आपल्या लग्नाचे थेट फोटोचं शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
नेहा जोशी (Neha Joshi) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहा जोशी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. यामधील तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले होते. नुकताच नेहाने लग्नगाठ बांधत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नेहाने ओंकार कुलकर्णीसोबत विवाह केला आहे. ज्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
नेहाने’वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ आदी नाटकं आणि ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर तिने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. नेहाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचा –
‘धर्मवीर हा व्यावसायिक चित्रपट’, केदार दिघेंचें मोठे वक्तव्य
भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते पाकिस्तानची ‘ही’ सुंदरी, फोटो पाहून फुटेल घाम