Friday, August 1, 2025
Home मराठी माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत चित्रपटांव्यतिरिक्त, सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून ती नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असते. आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी ती चुकवत नाही. आपण सर्वांनाच माहीत आहे की, प्राणी-पक्ष्यांवर पूजाचे खूप प्रेम आहे. तिच्या घरातही काही पाळीव प्राणी- पक्षी आहेत. यांच्यासोबतचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र नुकताच, पूजाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून माणुसकी अजूनही जिवंत आहे असे दिसून येते.

तिने एका घुबडाचे प्राण वाचवले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, कशाप्रकारे तो घुबड तिला मिळाला आणि तिने त्याचा जीव वाचवला.

व्हिडिओमध्ये पूजा म्हणते की, “आता उन्हाळा जवळ आला आहे आणि असे बरेच पक्षी आपल्याला दिसतात, जे तहानलेले असतात. तहान भागवण्यासाठी ते पाण्याच्या शोधात जातात आणि पाण्यात पडतात किंवा त्यांच्यासोबत काही अपघातही होतात. ज्यामुळे ते जखमी होतात. असेच एक घुबड आम्हाला सापडले. आम्हाला फोन आला की, एका पाण्याच्या टाकीमध्ये घुबड पडले आहे. आम्ही तिथे पोहचेपर्यंत त्या लोकांनी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले होते. पण ते खूप अशक्त आणि तहानलेले दिसत होते. त्याला त्वरित उपचाराची गरज होती. माझ्याकडील प्रथमोपचार मी त्याच्यावर केले आणि त्याला पशुवैद्याकडे घेऊन गेले. त्याच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर त्याच्यामध्ये लवकरच सुधारणा दिसू लागली. जेव्हा आम्हाला समजले की, हे घुबड आता उडू शकेल, तेव्हा आम्ही त्याला हवेत सोडले.”

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सर्वत्र पूजाचे खूप कौतुक होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला खूप पसंत केलंय. तसेच कमेंट करून चाहत्यांसह सेलेब्रिटीही तिची भरभरून प्रशंसा करत आहेत.

पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा