Friday, July 5, 2024

सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी स्वतःचा सहवास एन्जॉय करताना दिसली पूजा सावंत, आकर्षक लूकने चाहते घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. पूजाचे चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. अशातच पूजाचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

पूजाने सोशल मीडियावर तिचा एक समुद्र किनाऱ्यावरील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, पूजा समुद्र किनारी फिरताना दिसत आहे. त्याने केशरी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच डोक्यावर टोपी घातलेली दिसत असून, समुद्र किनारी सूर्यास्ताच्या वेळी पूजा अगदी मनसोक्त एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच एका लहान मुलीप्रमाणे पाण्यात खेळताना दिसत असून  एकांतात ती तिचा सहवास एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘मन मस्त मगन’ हे गाणे लागले आहे. (Marathi actress pooja sawant share her video on social media)

तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “तू इतकी सुंदर कशी?” तर बाकी अनेक चाहत्यांनी हार्ट ईमोजी पोस्ट करून तिच्या या व्हिडिओचे कौतुक केले आहे.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा