Wednesday, June 25, 2025
Home अन्य ‘हा’ आहे पूजा सावंतचा आवडता सण, फोटो शेअर करून अभिनेत्रीने व्यक्त केली उस्तुकता

‘हा’ आहे पूजा सावंतचा आवडता सण, फोटो शेअर करून अभिनेत्रीने व्यक्त केली उस्तुकता

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने लाईक केला जातो. अशातच पूजाचा एक फोटो समोर आला आहे.

पूजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी अनारकली ड्रेस घातला आहे. तिने लाल, जांभळ्या आणि हिरव्या रंगाचा एक ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यावर तिने सुंदर असे इअरिंग घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत. (marathi actress pooja sawant’s new photo viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “जेव्हा तुम्हाला माहित असतं की, तुमचा आवडता सण जवळ आला आहे.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते नेहमी प्रमाणेच कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. या आधी देखील तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते जोरदार प्रतिसाद देत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी पूजा तिच्या कुटूंबासोबत जेवायला गेली होती. तेव्हा देखील तिने तेथील फोटो शेअर केले होते.

https://www.instagram.com/p/CTd23dQpXI1/?utm_medium=copy_link

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा