Saturday, July 6, 2024

मराठमोळ्या पूजा सावंतचे साडीतील फोटो पाहून चाहत्याने रचली सौंदर्याची नवीन व्याख्या; तुम्हालाही आवडेल

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्रींमध्ये पूजा सावंतचाही समावेश होतो. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिचा अभिनय‌ आणि नृत्य पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने लाईक केला जातो. अशातच पूजाचा साडीमधील फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

पूजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूजाने लाल रंगाची काठाची साडी नेसलेली आहे. तिने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेला आहे. यासोबत तिने गळ्यात काही ज्वेलरी घातली आहे. तसेच इअरिंग आणि हातात बांगड्या घातलेल्या आहेत. तिने मिडल पार्टेशन करून केस मोकळे सोडले आहे. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. (Marathi actress pooja sawant’s new saree look photos viral on social media)

पूजाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे चाहते देखील फोटोला प्रतिसाद देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “सौंदर्याची व्याख्या म्हणजे पूजा सावंत.” तसेच बाकी अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

हे देखील वाचा