Thursday, March 13, 2025
Home मराठी मराठमोळ्या प्राजक्ता माळीने थेट सरकारकडेच केली कळकळीची विनंती, जाणून घ्या कारण

मराठमोळ्या प्राजक्ता माळीने थेट सरकारकडेच केली कळकळीची विनंती, जाणून घ्या कारण

उत्कृष्ट सुत्रसंचालिका, अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून लोकप्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) होय. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. ती प्रत्येक भूमिका अतिशय चोखपणे साकारत असते. म्हणूनच ती आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. अभिनेत्री आता चित्रपटांमध्ये देखील आपल्याला अभिनयाचा चांगलाच डंका वाजवत आहे. नुकताच अभिनेत्रीच्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात वावर आहे.

प्राजक्ता आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यासह ती कोणत्या नव्या चित्रपटात काम करणार आहे, याबद्दल देखील ती चाहत्यांना माहिती द्यायला विसरत नाही. नुकताच आता अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे.

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून, थेट सरकारलाच साकडं घालत कळकळीची विनंती केली आहे. अभिनेत्रीने व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, कोरोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी.”

व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणत आहे की, “नुकताच आमच्या पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर रिलीझ झाला. त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय मराठी सिनेमांना देखील तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र आता कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. मात्र सिनेमागृह असतील किंवा नाटकाचे प्रयोग याला आजही ५० टक्के उपस्थितीचा नियम आहे. त्यामुळे हा नियम शिथिल करून शंभरे टक्के उपस्थितीचा नियम करावा, अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे.” असे म्हणत अभिनेत्रीने थेट सरकारला कोरोनाचे नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे.

प्राजक्ता माळीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने झी मराठी या वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या भोळ्या आणि सालस स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याबरोबर तिने ‘खो-खो’ या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा