Friday, July 5, 2024

‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’, मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. ती तिच्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करते. इतर अभिनेत्रींप्रमाणे प्राजक्ताही सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करते. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यामध्ये ही नेहमीच आघाडीवर असते. आपल्या आयुष्यातील बाारीक- सारीक, चांगल्या- वाईट गोष्टीही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यासोबतच ती आपल्या हॉट आणि बोल्डपासून ते पारंपारिक अवतारातील फोटोही शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेला एक फोटो चाहत्यांना घायाळ करत आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ताने साडी घातलेली दिसत आहे. रंगीत साडी आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने केसांचीही साधी स्टाईल केली आहे. या लूकमध्ये तिचं रूप खुलून येत आहे.

तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एक चाहता तर पुरता फिदाच झालेला दिसत आहे. त्याने ‘तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा’ अशा आशयाची कमेंट केली आहे. ही कमेंट सर्वांचे लक्ष वेेधून घेत आहे.

आयएमडीबीनुसार, सन २००७ सालचा ‘गांधी, माय फादर’ या हिंदी चित्रपटातून प्राजक्ताने बॉलिवूड पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता अक्षय खन्नाही झळकला होता. यानंतर तिने ‘तांदळा’, ‘खो-खो’, ‘हंपी’, ‘मणिकर्णिका’ यांसारख्या मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे ओळख मिळाली.

अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी आपल्या ‘लकडाउन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. तिने अभिनेत्रीव्यतिरिक्त एक निवेदिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह माय गॉड! ४८ वर्षीय मंदिरा बेदीने केलं बिकिनीमध्ये वर्कआऊट, एकदा नजर टाकाच

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

हे देखील वाचा