Tuesday, July 9, 2024

‘आपण आनंदी आहोत यावर आपला विश्वास नाही;, म्हणत प्राजक्ता माळीने सांगितले नैराश्याचे कारण

आजच्या काळात नैराश्य हा अतिशय मोठा आणि सहज होणारा आजार बनला आहे. हा आजार फक्त गरीब लोकांना होतो असे नाही, तर श्रीमंत लोकांना देखील हा आजार झाल्याची अनेक उदाहरण आहेत. निराश्याबद्दल बोलताना अजूनही लोकं सहजतेने बोलत नाही. याबद्दलच लोकांना जागरूक करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुढे आली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली प्राजक्ता लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या मालिकेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने तिच्या लोकप्रियतेत वाढ केली.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहत प्राजक्ता सतत तिचे फोटो, व्हिडिओ टेकवून फॅन्सच्या संपर्कात असते. सध्या प्राजक्ताचा असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने मोकळेपणाने नैराश्यावर भाष्य केलेले दिसत आहे. यापासून वाचण्यासाठी तिने काही मोलाचे सल्ले सर्वाना दिले आहेत.

व्हिडिओमध्ये प्राजक्ता म्हणते, “तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किती वेळ असतात हे आपल्याला दिसत असते. किती तास फोनवर बोललात, व्हॉट्सऍप मेसेज आणि इतर सोशल मीडियावर तुम्ही किती वेळ घालवता? हे जर तुम्ही पडताळून पाहिले तर तुम्हाला समजेल की दुसरे त्यांच्या आयुष्यात काय करता हे पाहण्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात,आणि हेच डिप्रेशनचे कारण आहे. आपण आनंदी आहोत याच्यावर आपला विश्वास नाही…पण दुसरे आनंदी आहेत यावर मात्र आपण पटकन विश्वास ठेवतो. त्यांना पाहून आपल्याला आपण दुःखी आहोत असे वाटते. तु्म्ही डिप्रेशनला स्वतःहून निमंत्रण देत आहात. तुम्हला सोशल मीडियावर किती वेळ घालायचा आहे हे ठरवून घ्या आणि तेवढाच वेळ त्याला द्या. नाहीतर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल”. असा अतिशय अमूल्य आणि महत्वाचा सल्ला तिने सर्वाना दिला आहे.

‘विचारवेड’ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तिने दिलेल्या या महत्वाच्या सल्ल्याबद्दल लोकं तिचे कौतुक करत आहे. तत्पूर्वी अभिनयासोबतच इतर अनेक गोष्टींमध्ये निपुण असलेल्या प्राजक्ताने नुकताच तिचा ‘प्राजक्तराज’ नावाचा एक दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर

हे देखील वाचा