कलाकारांच्या कामाचा महत्वपूर्ण भाग म्हणून फोटोशूटकडे पाहिले जाते. कलाकार आणि त्यांचे फोटोशूट हे कमालीचे लोकप्रिय आहेत. विविध कपडे घालून ते अनेक फोटोशूट करतात. दागिने, कपडे, ऍक्सेसरीज आदी अनेक गोष्टींच्या जाहिरातीसाठी कलाकरांना हे शूट करावे लागतात. कलाकार आणि त्यांचे फोटोशूट त्यांना नेहमीच लाइमलाईट्मधे आणत असतात. या फोटोशूटसाठी त्यांना अनेक विचित्र कपडे घालावे लागतात, आणि काहीतरी वेगळे करण्याच्या नादात त्यांच्या पोज चुकतात आणि मग त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
कलाकार नेहमीच त्याच्या फोटोशूटचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. याच फोटोंमुळे कधी नेटकरी त्यांचे कौतुक करतात तर कधी त्यांना ट्रोल करतात. कलाकरांना त्यांच्या पोस्टवरून ट्रोल करणे हे काही नवीन नाही. मात्र आता ज्या कलाकाराला ट्रोल केले गेले आहे, ते जरा अनपेक्षित आहे.
View this post on Instagram
मराठीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीबद्दल सर्वांना सर्वच माहिती आहे. तिचे अभिनय करियर, तिचा फिटनेस, तिचा दागिन्यांचा ब्रँड आदी अनेक गोष्टी प्राजक्ता लीलया करते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटमधील फोटो पोस्ट केले आहे, ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. प्राजक्ताने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने नेव्ही ब्लु रंगाची रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टॉप घालत वेस्टर्न लूक केला आहे.
या ड्रेसवर प्राजक्ताने लांब कानातले, अंगठी, ब्रेसलेट घातले असून, केस मोकळे सोडले आहे. अतिशय कमी दागिने आणि कमी मेकअप करत तिने हा लूक केला आहे. या नक्कीच ती कमालीची सुंदर दिसते, मात्र तिला तिच्या लूकवरून नाही तर पोज वरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
प्राजक्ताने दिलेली एक पोझ लोकांना चांगलीच खटकली आहे. त्यावर आता त्यांनी कमेंट्स करत प्रश्न विचारले आहे. एकाने लिहिले, “प्राजू ही कुठली पोझ गं,”, दुसऱ्याने लिहिले, “सई ताम्हणकरबरोबर राहून तू पण विचित्र पोझमध्ये फोटो काढत आहेस प्राजू,” अजून एकाने लिहिले, “हा कोणता खेळ आहे, आम्हाला पण सांगा”, “मुंबईला विकेट किपर पाहिजे”. अशा कमेंट्स केल्या आहेत. यावर अजून प्राजक्ताने काही कमेंट केली नसली तरी या कमेंट्स वाचून ती देखील नक्कीच हसत असेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी