‘मितवा’ फेम मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तगडी फॅन फॉलोविंग असणारी प्रार्थना, तिच्याशी संबंधित अपडेट देण्यासाठी सतत चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील प्रार्थनाचा लूक अगदी पाहण्यासारखा आहे. यात आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. पारंपारिक लूकमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे. लाल साडीतील अभिनेत्रीच्या अदा पाहून युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
प्रार्थनाच्या या पोस्टची लक्षवेधी गोष्ट म्हणजे, फोटोखाली दिलेले कॅप्शन. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ये लाल इश्क, ये मलाल इश्क, ये ऐब इश्क, ये बैर इश्क.”
या कॅप्शनने चाहत्यांची मने जिंकली आहेत. फोटोला अगदी काही तासांतच 37 हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तसेच चाहते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून, अभिनेत्रीच्या कौतुकाचे पूल बांधत आहे.
प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘फ्रेश लाइम सोडा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रार्थनाचा पती अभिषेक जावकरने केले आहे. तो या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. हा चित्रपट रेड बल्ब स्टुडिओच्या बॅनरखाली तयार केला आहे. तसेच, चित्रपट ऑगस्ट 2021 मध्ये रिलीझ होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल