संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिनाची तयारी आणि उत्सव सुरू असतानाच मराठी चित्रपट जगताला मात्र धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे रविवारी (१ मे) रोजी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला दुःखद झटका बसला आहे. त्यांनी मराठीतील अनेक चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ यांसारख्या कलाकारांसोबत काम करून त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये देखील महंतांच्या भूमिका निभावल्या आहेत.
प्रेमा किरण या एक निर्मात्या देखील होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. त्यांनी १९९८९ मध्ये ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यांनी ‘धूम धडाका’, ‘दे दणादण’, ‘गडबड घोटाळा’, ‘माहेरचा आहेर’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावल्या आहेत. त्यांच्या चित्रपटातील गाणी देखील आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या डान्सने आणि अभिनयाने त्यांनी सगळ्यांना त्यांचा प्रेमात पाडले.
काही दिवसांपुरी त्यांच्या मुलीचे निधन झाले आहे. त्यांनतर त्या अगदी सद्मात गेल्या होत्या. अगदी एकट्या पडल्या होत्या. आता कुठे त्या या धडक्यातून सावरल्या होत्या तर त्यांच्या सोबत ही घटना घडली. त्यांच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास
- जयंती विशेष | जेव्हा मन्ना डे यांनी प्रेमिकेसाठी घातला होता वडिलांशी वाद; वडिलांनी ऐकलं नाही, तर आईने लाऊन दिले लग्न!
- BIRTH ANNIVERSARY | हेल्दी लाईफ स्टाईल फॉलो करायचे मन्ना डे, रिमिक्स गाण्यांना कधीच दिला नाही प्रतिसाद