Monday, June 23, 2025
Home मराठी ‘ही’ गोड चिमुकली आहे मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू बरं

‘ही’ गोड चिमुकली आहे मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू बरं

लहानपण हे सर्वांसाठीच जिव्हाळ्याची गोष्ट आहे. लहानपण एकदा हातातून गेले की, पुन्हा इच्छा असूनही परत येत नाही. आपण फक्त त्या आठवणी आपल्या मनात साठवून ठेऊ शकतो. मात्र, आपल्याकडे या आठवणींना रिफ्रेश करून पुन्हा उजाळा देण्यासाठी एक वस्तू कायम असते ती म्हणजे फोटो. तंत्रज्ञानाचा कॅमेरा हा अविष्कार आपल्या आठवणींना जागृत करण्यासाठी मोलाचा वाटा निभावतो. त्यामुळेच आपण आपले जुने फोटो पाहून त्या दिवसांना पुन्हा जगत असतो. प्रत्येकालाच आपले लहानपण प्रिय असते.

याला कलाकार देखील अपवाद नाहीत. कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे लहानपण फॅन्ससोबत अनेकदा शेअर करत असतात. त्यांच्या लहानपणीचे फोटो हे चाहत्यांसाठी देखील आवडीचा विषय असतो. आपले आवडते कलाकार त्यांच्या लहानपणी कसे होते, हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अशीच इच्छा पूर्ण केली आहे एका मराठीच्या आघाडीच्या अभिनेत्रीने.

मराठीमधील बबली, क्युट आणि हसरी अभिनेत्री म्हणजे ‘प्रिया बापट’. प्रियाने नुकताच तिचा आणि तिच्या बाबांचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. प्रियाचा हा फोटो तिच्या लहानपणाचा असून यात ती तिच्या बाबांच्या कडेवर बसलेली दिसत आहे. तिने हा फोटो पोस्ट करताना लिहिले, ” बाबा आणि मी”. या फोटोला तिच्या फॅन्सने भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

सध्या प्रिया तिच्या एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करतेय. ‘फादर लाइक’ असे तिच्या सिनेमाचे नाव असून सिंगापूर इथे याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.

हेही वाचा-

“मेरी तनहाई और मसाला चाय बस्स”, भन्नाट कॅप्शनसह प्राजक्ताने नवीन फोटो केला शेअर

‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’, सोनालीने शेअर केलेले ‘ते’ खास फोटो पाहिलेत का?

साडीत खुलून आलं अप्सरेच सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे साडीतील पाच खास फोटो

हे देखील वाचा