या कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहून सर्वांनी तंदुरुस्त राहण्याची खूप गरज आहे. लॉकडाऊन असल्याकारणाने, जिम बंद आहेत. अशा वेळी, कलाकार मंडळी घरीच व्यायाम करून, फिट राहण्यावर भर देत आहेत. फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटही त्याच कलाकारांपैकी एक आहे.
अभिनेत्री घरी राहूनच आपले व्यायामाचे सत्र नियमित फॉलो करत आहे. एवढेच नव्हे, तर ती आपले व्यायामाचे व्हिडिओ शेअर करून, इतरांनाही तंदुरुस्त राहण्याचे आवाहन करत आहे. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दोरीच्या उड्या मारताना दिसली आहे.
व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुम्हाला शंका येते, तेव्हा उड्या मारा. या क्वारंटाईनमधील माझा बेस्टफ्रेंड!” या व्हिडिओवर एका चाहत्याने अतिशय मजेदार कमेंट केली आहे. चाहत्याने लिहिले की, “तुम्ही असे उड्या मारत राहिलात, तर खालचे काका येतील की वरी.” व्हिडिओसोबत ही कमेंटही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
याशिवाय कामत दाम्पत्य त्यांच्या रोमँटिक फोटोंसाठीही चर्चेत असतात. प्रियाचे तिचा पती अभिनेता उमेश कामतसोबतचे रोमँटिक फोटो दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच कामत जोडप्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, योग्य उपचार घेतल्यानंतर दोघेही बरे झाले आहेत. कोरोनातून बरी झाल्यानंतर, अलीकडेच प्रियाने रक्तदान केले होते. याचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिने इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर