Thursday, April 17, 2025
Home मराठी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापट दिसतेय खूपच सुंदर; अभिनेत्रीच्या आकर्षक लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापट दिसतेय खूपच सुंदर; अभिनेत्रीच्या आकर्षक लूकने चाहत्यांना पाडली भुरळ

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. प्रत्येक अभिनेत्रींमध्ये काहीतरी खास गोष्ट असते. यातीलच एक सुंदर आणि सालस अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. प्रत्येक भूमिकेमधील प्रियाचा लूक काहीतरी नवीन आणि सर्वांना आकर्षित करणारा असतो. त्यात तिच्या फॅशन सेन्सची तर सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच समस्त मराठी प्रेक्षकांना भुरळ घालणारा तिचा एक लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

प्रिया बापटने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने हिरव्या रंगाचा स्कर्ट, स्लिव्हलेस ब्लाउज आणि सोबत छान अशी ओढणी घेतली आहे. तिने यावर एक डायमंडचा नेकलेस घातला आहे, तसेच नेकलेसला मॅचिंग अशी बिंदी आणि बोटात अंगठी घातली आहे. तसेच या ड्रेसवर तिने हलकासा मेकअप केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तसेच तिचे चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. याआधी देखील प्रियाने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यांना देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली होती. (marathi actress priya bapat’s beautiful photos viral on social media)

प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘ऐका दाजीबा’, ‘पिंपळ’, ‘गच्ची’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमप्लिज’, ‘टाईमपास २’, ‘आणि काय हवं’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘गुलाबजाम’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा