अभिनेत्री प्रिया बापटने चित्रपटसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक हटक्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहे.
प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. यात तिने निळ्या रंगाचा लायनिंगचा एक शर्ट घातलेला आहे. तसेच निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. केसांचा हाफ बन घातला आहे. तिची ही हेअर स्टाईल तिच्या या लूकला अगदी शोभून दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. (marathi actress priya bapat’s new look vital on social media)
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तुमचे दिवसाचे स्वप्न संपवू नका.” तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “प्रिया कसली भारी दिसतीये कडक.” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
याशिवाय प्रिया संजय दत्तसोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिची आणि तिचा पती उमेश कामत यांची ‘आणि काय हवं’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुंदर अन् सोज्वळ! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं रुपाली भोसलचं ‘आकर्षक’ सौंदर्य