Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आहा…किती भारी! ‘शालू’चा ग्लॅमरस लूक लावतोय चाहत्यांना वेड, नेटकरी म्हणतायत, ‘कडक ना राणी’

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. २०१३ साली नागराज मंजुळे एक वेगळी कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर आले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘फॅन्ड्री’ होय. या चित्रपटाला खास करून ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता.

या चित्रपटाच्या कहाणीसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री देखील चांगलीच लोकप्रिय झाली. ती अभिनेत्री सगळ्यांची लाडकी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात. राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या पारंपारिक लूकपासून ते अगदी हॉट आणि बोल्ड लूकचे ती तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Marathi actress rajeshwari kharat share her glamorous photos on social media)

राजेश्वरीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच केस सेमी कर्ल केले आहेत. या ड्रेसवर तिने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. तसेच पायात देखील काळ्या रंगाची चप्पल घातली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोवर एका चाहत्याने “कडक ना राणी,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच तिने तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ती वेशा भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते तिला या चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’, मराठमोळ्या मयुरी देशमुखचे सुंदर फोटो पाहून चाहताही घायाळ

-रिंकूने आपल्या कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर; तुम्हालाही आवडेल अभिनेत्रीचं ‘प्राणीप्रेम’

-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

हे देखील वाचा