Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शालू, तुझा फोटो पाहून काळजाचं पाणी पाणी झालंय गं…’, राजेश्वरीचा नवा अंदाज पाहून चाहते ‘क्लिन बोल्ड’

सोशल मीडिया हे आता केवळ संभाषणाचे साधन राहिले नसून, आपले कलागुण दाखवण्याचे व्यासपीठ झाले आहे. आज अगदी कलाकारांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. यात एका मराठमोळ्या अभिनेत्रीचाही समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालणारी ही अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात.

आपल्या ग्लॅमरस अंदाजने ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या एका चित्रपटाने तिला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याकारणाने तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे तिचा कोणताही फोटो अपलोड होता क्षणीच व्हायरल होत असतो.

राजेश्वरीचा नुकताच एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिने या फोटोत गुलाबी आणि काळया रंगाची साडी घातली आहे. तसेच काळया रंगाचा ब्लाऊज घातला आहे. हातात अंगठी आणि नखांवर नेलपेंट देखील साडीला मॅचिंग लावली आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. कानात घातलेल्या इअर रिंग्ज आणि एका बाजूला सोडलेले मोकळे केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली दिसून येते. तसेच तिने हलकासा मेकअप केलेला दिसून येतोय.

https://www.facebook.com/100044631000266/posts/292230225608009/

तिचा हा फोटो अपलोड होऊन अवघे काही तास झाले आहेत. परंतु तिच्या या फोटोला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिच्या या फोटोला काही तासातच 10 हजार पेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे. तसेच चाहत्यांकडून कमेंटचा देखील जोरदार वर्षाव होताना दिसत आहे.

राजेश्वरी ही एक चित्रपटाचे कोणतेही बॅकग्राउंड नसलेल्या घरातून आलेले मुलगी आहे. तिने 2004 मध्ये ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केली होते.त्यावेळी राजश्री इयत्ता नववीमध्ये शिकत होती. या चित्रपटातील साध्या भोळ्या ‘शालू’ या पात्राने तिला सर्वत्र लोकप्रियता मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा