Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जो त्रास मी सहन केलाय, तसा त्रास सहन करण्याची वेळ कुणावरही येऊ नये,’ का केली राजेश्वरी खरातने भावनिक पोस्ट?

भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वकाही विस्कळीत झाले आहे. आरोग्य यंत्रणांवरील ताणही प्रचंड वाढला आहे. विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यादरम्यान अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशामध्ये कलाकार आपल्या चाहत्यांना कळकळीचे आवाहन करून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. यामध्ये ‘शालू’चाही म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरातचाही समावेश आहे. तिनेही आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेत आहे.

राजेश्वरीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती तिने २६ एप्रिल रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत दिली होती. यावेळी चाहत्यांनी तिला काळजी घेण्यासाठी हजारो कमेंट केल्या होत्या. यावेळी तिच्यावर असणारं चाहत्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं.

कोरोनाची लागण झाल्यानंतर झालेला त्रास तिने अनुभवला होता. म्हणून त्यानंतर तिने ८ मे रोजी एक भावनिक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने आपल्याला झालेला त्रास आपल्या चाहत्यांना होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

राजेश्वरी आपल्या पोस्टमध्ये म्हणाली की, “कसे आहात सर्वजण?? काळजी घ्या, जो त्रास मी सहन केला आहे मला नकोय की आपल्यापैकी कोणी अजून हा त्रास सहन करावा. म्हणून सर्वांनी काळजी घ्या आणि सामाजिक अंतराचे पालन करा, मास्क लावा, सुरक्षित राहा.”

तिच्या या पोस्टवरही चाहत्यांनी नेहमीप्रमाणे प्रेम लुटवले. चाहत्यांनी तब्बल ३ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स केल्या. याव्यतिरिक्त ६० हजारांपेक्षा अधिक लाईक्सही या पोस्टला मिळाले.

राजेश्वरीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१४ साली रिलीझ झालेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटातील ‘जब्या’ आणि ‘शालू’ हे पात्र विशेष गाजले. चित्रपटात जरी शालूच्या वाट्याला फार डायलॉग आले नसले, तरीही तिच्या सहजसुंदर अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. यानंतर शालूने सन २०१७ साली आलेल्या ‘आयटमगिरी’ या चित्रपटातही काम केले. मात्र, ‘फँड्री’प्रमाणे या चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली नाही.

शालू सध्या चित्रपटांपासून लांब आहे, परंतु असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहणारी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील गोष्टी, नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी जोडलेली असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…

-‘तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी’, पाहा राजेश्वरी कोणासाठी गातीये ‘हे’ गाणे

हे देखील वाचा