Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

ओहो! ‘पार्टी ऑल नाईट’ गाण्यावर ‘शालू’ने दिले भन्नाट एक्सप्रेशन्स; चाहत्यांकडून मिळतेय कमालीची पसंती

आजकाल सोशल मीडियाचा वापर तर जवळपास सगळेच कलाकार करतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राजेश्वरी खरात होय. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. तरीही, तिचा चाहतावर्ग नावाजण्याजोगा आहे. तिचा कोणताही व्हिडिओ शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतो. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘पार्टी ऑल नाईट’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. यासोबतच तिने पार्टीचा फिल्टर वापरला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच कर्ली हेअर केले आहेत. तिचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. (Marathi actress Rajeshwari kharat’s video viral on social media)

राजेश्वरीचे चाहते तिच्या या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देतात. तिचा हा व्हिडिओ देखील त्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://www.instagram.com/reel/CTXJSsuqUFl/?utm_source=ig_web_copy_link

राजेश्वरीने नुकतेच सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूनंतर त्याचा फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याचा फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.”

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनालीच्या साडीमधील स्टायलिश लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘तुम्हाला कधीही बघावं, पहिल्यापेक्षा…’

-‘दिवसेंदिवस तू सुंदर दिसत आहेस’, तेजश्री प्रधानच्या सुंदर फोटोवर चाहता घायाळ

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

हे देखील वाचा