Friday, July 5, 2024

सगळ्यांची आवडती शनाया अडकरणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंड आदित्यने सोशल मीडियावरून दिली माहिती

टेलिव्हिजनवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत नकारत्मक भूमिका साकारून अभिनेत्री रसिका सुनीलला खूप लोकप्रियता मिळाली. असे खूप कमी कलाकार असतात, ज्यांना एकाच मालिकेने आणि त्यातही नकारात्मक भूमिकेला एवढी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. त्यातील एक म्हणजे रसिका होय. मालिकेतील तिचे शनाया नावाचे पात्र खूपच गाजले. तिचा चंचल आणि नटखट स्वभाव सगळयांना भावला. सोशल मीडियावर देखील ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मागील काही दिवसांपूर्वी रसिकाने तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलगीसोबत काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्या रिलेशनबाबत चांगलीच चर्चा रंगली. अशातच त्यांचा एक फोटो समोर आला आहे. यातून ते त्यांच्या आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीची घोषणा करताना दिसत आहेत.

रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्य बिलगीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि रसिकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आदित्य आणि रसिकासोबत एक कुत्रा दिसत आहे. त्याच्या मांडीवर एक पाटी दिसत आहे. यावर लिहिलेले आहे की, “माझे हे माणसं लवकरच लग्न करणार आहेत.”

हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा रसिकाने मला पहिल्यांदा रशला भेटायला नेले होते. तेव्हा तो म्हणाला की, माझ्या वयात एका नजरेतच समजत होते की, एका मुलामध्ये आणि मुलीमध्ये काय चालले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला रशच्या अंदाजावर घेऊन जाण्याचे ठरवले. लव्ह यू रसिका, हे अधिकृत करायला मी आणखी जास्त वाट बघू शकत नाही.” (marathi actress rasika sunil getting married soon, her boyfriend give information on socila media)

त्यांच्या या फोटोवर त्यांचे अनेक चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने “अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. यासोबत तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय ती ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा