Friday, July 5, 2024

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम ‘शनाया’च्या नवीन लूकने चाहते घायाळ; फोटोवर पडतोय कौतुकाचा पाऊस

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे नाव घेतले, तर गुरुनाथ नंतर लगेचच शनायाची आठवण येते. शनाया अर्थातच अभिनेत्री रसिका सुनीलची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरीही यातील पात्रं नक्कीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. रसिका सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांशी संपर्कात राहते. शिवाय ती आपले फोटो शेअर करून, नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रसिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने राखाडी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने पायात लॉन्ग सॉक्स घातलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये ती खाली बसून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच गोड आणि बोल्ड दिसत आहे.

रसिकाने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिचे चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. कोणी तिला ‘सुंदर’ म्हणत आहे, तर कोणी ‘हॉट’ म्हणत आहे. अशाप्रकारे तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. रसिकाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर ५३ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच चाहते सातत्याने कमेंट करताना दिसत आहेत. (marathi actress rasika sunil’s bold and beautiful photos viral on social media)

काही दिवसांपूर्वी तिचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ते दोघे खूप चर्चेत आले होते. तसेच ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले होते.

रसिकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते, तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये भूमिका साकारत टीव्हीच्या जगात पाऊल ठेवले. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे. तसेच तिने एका लावणीवर डान्सही केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा