Tuesday, April 15, 2025
Home अन्य रंगीत साडी नेसून ‘शनाया’चे सुंदर फोटोशूट; चाहता म्हणाला, ‘मेरी नजर से खुद को देखना…’

रंगीत साडी नेसून ‘शनाया’चे सुंदर फोटोशूट; चाहता म्हणाला, ‘मेरी नजर से खुद को देखना…’

‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील होय. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तिच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. खलनायिकाच्या भूमिकेत असूनही तिने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले होते. प्रेक्षक तिचा द्वेष करत असले, तरीही प्रेक्षकांना ती तेवढीच आवडायची. या मालिकेत तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारले होती. शनाया जेवढी मस्तीखोर होती, तेवढीच रसिका देखील मस्तीखोर आहे. याची प्रचिती आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रसिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रसिकाने रंगीबेरंगी साडी नेसलेली दिसत आहे. तिच्या या साडीमध्ये पांढरा, काळा, पिवळा आणि लाल हे रंग पाहायला मिळत आहेत. तसेच तिने यावर राखाडी रंगाचा ब्लाऊज घातलेला आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress rasika Sunil’s colourful saree photos viral on social media)

रसिकाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव चालू आहे. चाहत्यांना तिचा हा लूक नेहमीप्रमाणेच खूप आवडला आहे. या फोटोवर तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मेरी नजर से कभी खुद को देखना, खुद ही खुद पे फिदा हो जाओगे.” दुसऱ्या एक चाहत्याने कमेंट केली आहे की, “तेरी झुकी नजर.” तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मागील अनेक दिवसांपासून रसिका तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी याच्यासोबत केलेल्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. त्या दोघांनीही अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत, अशा चर्चा देखील चालल्या आहेत.

रसिकांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अगं किती गोड’, म्हणत ‘राधिका’च्या सौंदर्यावर भुलली ‘ही’ अभिनेत्री

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

हे देखील वाचा