आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी आणि खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू होय. रिंकूला तिच्या रिंकू या नावापेक्षा आर्ची या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली. तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तीचा कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशातच रिंकूचे प्राणीप्रेम पाहायला मिळाले आहे.
रिंकूने नुकतेच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती एका कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाची जिन्स आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच सगळे केस मागे बांधले आहेत. या लूकमध्ये एकंदरीत ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ती ज्याप्रकारे कुत्र्यासोबत खेळत आहे. त्यातून तिचे प्राणी प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. (Marathi actress rinku rajguru share a video while playing with dog)
तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच तिचे प्राणी प्रेम देखील आवडले आहे. त्यामुळे अनेकजण या व्हिडिओवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मार ही डालोगी क्या?’, अमृता खानविलकरच्या बोल्ड अदांवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया
-साडीमध्ये खुललंय मराठमोळ्या प्रिया बापटचं सौंदर्य! फोटो शेअर करत म्हणतेय, ‘बैठे बैठे…’
-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट