चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’ होय.
या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्र अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. आपण अनेकवेळा तिचे प्राणी प्रेम पाहिले आहे. ती बऱ्याच वेळा कुत्र्यासोबत व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. (Marathi actress rinku rajguru share her video on social media)
रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मांजरीसोबत खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स घातले आहेत. व्हिडिओमध्ये मांजर उड्या मारताना दिसत आहे. तसेच रिंकू देखील हे सगळं एन्जॉय करत आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आजच्या दिवशी खूप काही करायचं ठरवलं होतं, पण केलं काहीच नाही.” तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; चाहता म्हणाला, ‘खूपच सुंदर म्हणजे दुधात साखर’
-‘डिझेल आणि पेट्रोलने उतरवली सोन्या-चांदीची मस्ती’, मराठमोळ्या सुबोध भावेची पोस्ट चर्चेत
-केशरी रंगाचे महत्व सांगत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अपूर्वा नेमळेकरचा जगदंबा अवतार










