Saturday, June 29, 2024

गुलाबी साडी नेसून आर्चीने घेतली ‘मिरर सेल्फी’; चाहत्यांना भावतोय अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’.

या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली, ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्रं अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे. (Marathi actress rinku rajguru’s new photo viral on social media)

रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिंकू खूप सुंदर दिसत आहे. तिने आरशा समोरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकूने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. यासोबत तिने गळ्यात मोत्याचा हार आणि ईअरिंग घातले आहेत. तसेच नाकात नोजपिन घातली आहे. कपाळी लाल रंगाची टिकली लावली आहे. एकंदरीत या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

रिंकूने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच तिच्या एका चाहत्याने
“नाद आहे तू” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “अगदी अप्सरा दिसतेस” अशी कमेंट केली आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा