Wednesday, July 3, 2024

स्वतःला सकारात्मकतेने भरा सांगणाऱ्या आर्चीचा, गुलाबी क्रॉप टॉप आणि पँटमध्ये दिसला कमनीय बांधा

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’.

या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्र अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर घर करून आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे. (Marathi actress rinku rajguru’s new photo viral on social media)

रिंकूने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत असून, तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर अभिनेत्री स्पृहा जोशी हिने देखील कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते या फोटोवर सातत्याने हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. रिंकूच्या लूकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. तिच्या पहिल्या चित्रपटात ती दिसत होती त्यापेक्षा ती आता खूपच बोल्ड आणि फिट दिसते.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा