Wednesday, July 3, 2024

‘ही तर मराठीतील दिशा पटानी!’ रिंकूचे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांच्या उमटतायेत प्रतिक्रिया

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी कलाकारांना अहोरात्र कष्ट घ्यावे लागतात. दिवस रात्र मेहनत करून ते या चंदेरी दुनियेत प्रवेश करत असतात. पण काही कलाकार एकाच चित्रपटाने एवढे लोकप्रिय होतात की, भविष्यात जेव्हा केव्हा त्या चित्रपटाचा नाम उल्लेख केला जातो. तेव्हा त्या कलाकाराचे नाव समोर येते. असाच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर राहणारा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. एक वेगळाच विषय घेऊन आलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात काय तर देशात गाजला होता. सोबतच या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी पात्रं देखील प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती. यात आर्ची या भूमिकेत असणाऱ्या रिंकू राजगुरूचा धाडसी अंदाज सगळ्या प्रेक्षकांना आवडला होता. हा रिंकूचा पहिलाच चित्रपट होता, पण या चित्रपटाने तिला यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. आता रिंकू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकूने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या सोबत तिने पिवळ्या रंगाचे इअरिंग घातले आहेत. तसेच पायात चप्पल घातली आहे. एका फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा कुत्रा देखील दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच रिलॅक्स दिसत आहे. (marathi actress rinku rajguru’s new photos viral on social media)

रिंकूने हे फोटो शेअर करून एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “आयुष्य खूप लहान आहे आणि वेळ खूप पटकन जात आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण एन्जॉय करा.” तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “मराठीतील दिशा पटानी व्हर्जन” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. रिंकूच्या लूकमध्ये कमालीचा बदल आला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक देखील खूप आवडत आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा