Monday, February 24, 2025
Home मराठी कहरच! स्विमिंग पूलजवळ बसून रुचिराने दाखवली तिच्या हॉटनेसची झलक, एक नजर टाकाच

कहरच! स्विमिंग पूलजवळ बसून रुचिराने दाखवली तिच्या हॉटनेसची झलक, एक नजर टाकाच

बॉलिवूड प्रमाणेच मराठी सृष्टीतही बोल्डनेस पाहायला मिळत आहे. पडद्यावर सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र बऱ्याच ग्लॅमरस असतात. तर काहीजणी पडद्यावर जितक्या ग्लॅमरस, त्याहीपेक्षा अधिक त्या खऱ्या आयुष्यात बोल्ड असतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात काम करून, अभिनेत्री रुचिरा जाधवने बरीच वाहवा मिळवली. यात तिचे पात्र छोटे असले तरीही ते चांगलेच प्रसिद्ध झाले होते. रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इतकेच नव्हे, तर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेट बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. नुकताच रुचिराने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांना वेड लावताना दिसत आहेत.

रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात नेहमीप्रमाणे अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. यात रुचिराने स्कीन कलरचा ब्रालेट, तर काळ्या रंगाची शॉर्ट पँट घातली आहे. व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात रुचिरा अतिशय हॉट स्टाईलमध्ये आपल्या अदा दाखवत आहे. तिच्या या मादक व्हिडिओने चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

रुचिराने ही पोस्ट शेअर करताच, ती व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. यातील तिचा घायाळ करणारा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तुम्ही पाहू शकता की अगदी कमी वेळात या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या व्हिडिओवर ३२ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे. सोबतच नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकांचे पूल बांधत आहेत.

रुचिकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत झळकली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती, जिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिने ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ यासारख्या अनेक मालिकांमध्येही रुचिका दिसली आहे. शिवाय तिने ‘लव लफडे’, ‘सोबत’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा