Monday, July 1, 2024

खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

मराठी बिग बॉसचं दुसरं पर्व खूपच गाजलं होत. या सिझनमध्ये अनेक कलाकार सामील झाले होते.‌ यामध्ये प्रेम, मस्ती, विनोद, मनोरंजन, डान्स, गाणं या सगळ्या गोष्टींचा प्रेक्षकांनी अगदी भरभरून आनंद घेतला होता. यातील स्पर्धक देखील खूप अतरंगी होते. यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुपाली भोसले. रुपाली ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. रुपाली सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही हटके लूकमधील फोटो समोर आले आहेत.

रुपालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाचा खण स्कर्ट आणि गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर तिने ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे. तसेच नाकात नथ देखील घातली आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Rupali bhosale share her latest photo on social media)

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा मॉर्डन आणि ट्रेडिशनल टच असलेला लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील असाच ड्रेस घालून फोटो शेअर केले होते. तिचा लूक देखील नेटकऱ्यांना खूप आवडला होता.

रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे संजना नावाचे पात्र चांगलेच गाजले. नकारात्मक भूमिकेत असूनही तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा