‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या डान्सने देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. रुपाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ‘बिग बॉस मराठी २’ नंतर तर तिची लोकप्रियता आणखीच वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची प्लेन साडी नेसली आहे. यावर तिने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. गळ्यात छोटसं मंगळसूत्र घातलं आहे. तसेच हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आहे. (Marathi actress Rupali bhosale share her photos on social media)
तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “खरंच नैसर्गिक सौंदर्य,” तर आणखी एकाने “हार्ट किलर लूक” अशी कमेंट केली आहे. तर बाकी अनेक चाहत्यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत.
रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारखे मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे संजना नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे, तरी देखील तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. या मालिकेत सध्या अनेक वळणं पाहायला मिळत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!