Saturday, July 6, 2024

सुंदर अन् सोज्वळ! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं रुपाली भोसलचं ‘आकर्षक’ सौंदर्य

मराठी ‘बिग बॉस’ची स्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांसाठी शेअर करून त्यांना प्रभावित करण्याची एकही संधी ती सोडत नाही. रुपाली सध्या स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती नकारात्मक व्यक्तिरेखेत आहे. तरी देखील तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे. तिचे संजना नावाचे पात्र चांगलेच गाजले आहे. अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील ती प्रेक्षकांशी जोडून असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.

रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक सुंदर आणि सिंपल फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अत्यंत साधी पण तेवढीच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये रुपालीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने कानात मोठे इअरिंग घातले आहे. ती एका पुलावर उभी राहिलेली दिसत आहे. (marathi actress rupali bhosale’s simple photos viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने व्हाईट कलरच्या हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तिचे चाहते देखील फोटोवर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “रुपा खरंच किती सुंदर दिसतेस गं तू.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्री आहे. तिचा फॅशन सेन्स देखील खूप चांगला आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिने वेळोवेळी प्रेक्षकांना तिच्या फॅशन सेन्सचे दर्शन दिले आहे.

तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा