Thursday, July 31, 2025
Home मराठी ऋतुजा बागवेच्या साधेपणाने घातली प्रेक्षकांना भुरळ, ‘हे’ कॅप्शन देत सोज्वळ फोटो केले शेअर

ऋतुजा बागवेच्या साधेपणाने घातली प्रेक्षकांना भुरळ, ‘हे’ कॅप्शन देत सोज्वळ फोटो केले शेअर

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे खूप चर्चेत असते. तसेच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील बऱ्यापैकी चर्चेत असते. खरंतर ऋतुजाचा समावेश मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत सोज्वळ अभिनेत्रींमध्ये होतो. तिचा हा सोज्वळ आणि साधेपणा तिच्याकडे पाहता क्षणीच प्रेक्षकांच्या ध्यानात येतो. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. अलीकडेच तिने काही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्या लूकमध्ये ती अत्यंत साधी, पण तेवढीच सुंदर दिसत आहे.

ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋतुजाने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लेगीज परिधान केली आहे. यासोबतच तिने पायात पांढऱ्या रंगाची कोल्हापुरी चप्पल घातली आहे. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहेत. तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले आहे. ती एका बाकावर बसून पोझ देताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आज कोणाच्यातरी हसण्याचे कारण बना.” तिचे चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. सर्वांना तिचा हा साधा अंदाज खूपच भावला आहे. (marathi actress rutuja bagave’s simple photo viral on social media)

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा