Saturday, June 29, 2024

ढळला पदर खिळल्या नजरा! प्राजक्तानंतर मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्रींच्या व्हायरल पोस्टची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसत असते. सध्या मराठी सिने जगतातील अशाच एका अभिनेत्रीच्या बोल्डनेसने नेटकऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे. ही चर्चा होतेय ती अभिनेत्री ऋतुजा बागवेची (Rutuja Bagwe). ऋतुजा बागवेने सध्या सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

ऋतुजा बागवे ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सध्या ऋतुजा तिच्या व्हायरल फोटोशूटमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.  तिच्या या व्हायरल पोस्टमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळत आहे.

हे फोटो ऋतुजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची साडी आणि हलकासा मेकअप केलेला दिसत आहे. ऋतुजाने हे ब्लॅक ऍंन्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत. अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. याआधीही तिच्या व्हायरल फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. यामध्ये ऋतुजाने लिंबू कलरची साडी घालून नेटकऱ्यांना घायाळ केले होते. तिच्या या फोटोशूटच्या कॅप्शनवरुन तिने अशी ही बनवा बनवी चित्रपटाची आठवणही प्रेक्षकांना करुन दिली होती.

 

 

दरम्यान अभिनेत्रीच्या सिने जगतातील कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. ऋतुजाच्या गाजलेल्या मालिकांमध्ये या गोजिरवाण्या घरात, स्वामिनी, मंगळसुत्र, चंद्र आहे साक्षीला, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिने रिस्पेक्ट, शाहीद भाई कोतवाल या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 

हे देखील वाचा