Saturday, July 6, 2024

‘मी आणखी एका वर्षाने मोठी…’, म्हणत ऋतुजाने स्वतःलाच बर्थडे विश करत फोटो केला शेअर

मराठी मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्री आहेत. मात्र यातील एक अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत असते, आणि ती म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाचा आजकाल सोशल मीडियावरचा वावर चांगलाच वाढला आहे. दररोज ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. ऋतुजा अभिनयाच्या बाबतीत खूप सरस आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. साध्या भूमिकांपासून ते मॉर्डन भूमिकांपर्यंत सर्वच पात्र साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ऋतुजा गुरुवारी (९ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिने तिचा एक फोटो शेअर करून स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून, पायात हाय हील्स आणि कानात सुंदर इअरिंग घातले आहेत. या ड्रेसवर तिचे मोकळे केस अधिक चांगले दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” मी आणखी एका वर्षाने मोठी, हुशार आणि आनंदी झाले आहे. ९.९.८८ (३३).” तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असून, तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर हेमांगी कवी, नंदिता, सोनाली कुलकर्णी, मंजिरी ओक, सोनाली खरे यांसारख्या कलाकारांनी शुभेच्या दिल्या आहेत.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत सुबोध भावेसोबत काम केले आहे.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

 

हे देखील वाचा