Saturday, July 6, 2024

मराठमोळ्या ऋतुजा बागवेने साडीतील नवीन फोटो केला शेअर; पाहून चाहता म्हणाला, ‘करारी बाणा’

अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचा सोज्वळ अंदाज नेहमीच प्रेक्षकांना भावतो. आजकाल अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून चांगल्याच चर्चा रंगवत असते. सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती चाहत्यांचे लक्ष वेधते. अलीकडेच तिने पोस्ट केलेला फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋतुजाने आकाशी रंगाची प्लेन साडी नेसली आहे. तसेच तिने यावर गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच ब्लाऊजला मॅचिंग असे कानात ईअरिंग घातले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. (Marathi actress Rutuja bagwe share her photo on social media)

हा फोटो शेअर करून ऋतुजाने गुलाबी आणि निळ्या रंगाच्या हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. चाहते देखील फोटोवर कमेंट्स करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “करारी बाणा,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. ती अनेकवेळा तिचे साडीमधील फोटो शेअर करत असते.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…मला हार्ट अटॅक येईल’, म्हणत चाहत्यांनी दिल्या अक्षया देवधरच्या मराठमोळ्या लूकवर एकापेक्षा एक प्रतिक्रिया

-‘उफ्फ तेरी ये अदा’, मिथिला पालकरच्या नवीन फोटोने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

-‘खतरनाक…’, बिकिनीमधील अनन्याची घायाळ करणारी अदा पाहून, उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हे देखील वाचा