Saturday, March 21, 2026
Home मराठी ‘पलट’ म्हणणाऱ्या ऋतुजाच्या सौंदर्याची चाहत्याला पडली भुरळ, ‘तुझ्या सौंदर्याला सीमा नाही’ म्हणत केलं कौतुक

‘पलट’ म्हणणाऱ्या ऋतुजाच्या सौंदर्याची चाहत्याला पडली भुरळ, ‘तुझ्या सौंदर्याला सीमा नाही’ म्हणत केलं कौतुक

सोशल मीडिया हे आजकाल सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे ठिकाण झाले आहे. प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. त्यात कलाकार तर काय या बाबतीत आघाडीवर आहेत. यातील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा वरचा नंबर लागतो. ती देखील दररोज तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची वेगवेगळ्या रंगाचे डॉट असलेली साडी नेसलेली आहे. या साडीवर तिने पांढरा रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने हिरव्या रंगाचे गळ्यातले आणि कानातले घातले आहेत. यासोबत तिने कानाला एक फुल लावलेले दिसत आहे. साडीमध्ये नेहमी प्रमाणेच ती खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress Rutuja bagwe share her saree look photos on social media)

हा फोटो शेअर करून ऋतुजाने “पलट” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर अश्विनी केसर हिने “वाव” अशी कमेंट केली आहे. तसेच एका चाहत्याने “फुलपाखरू” अशी कमेंट केली आहे तर तसेच दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुझ्या सौंदर्याला कोणतीच सीमा नाही.”

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा