Saturday, July 6, 2024

‘…तूच सांग कसं सावरू मी स्वतःला’, ऋतुजा बागवेचा फोटो पाहून चाहत्याला भावना अनावर

मराठी टेलिव्हिजनवर जेव्हा सोज्वळ अभिनेत्रींचे नाव निघते, तेव्हा अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या नावाचा त्या यादीत हमखास समावेश असतो. ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण प्रत्येक पात्रात ती सोज्वळ अंदाजात दिसली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती बहुतांश वेळा तिचे साडीमधील फोटो शेअर करत असते. आता देखील तिचे असेच साडीमधील काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने लाल रंगाचा स्टँड कॉलरचा ब्लाऊज घातला आहे. तिच्या ब्लाऊजवर गणपती बाप्पासोबत एक स्त्रीचे चित्र दिसत आहे. तसेच तिने गळ्यात देखील तसेच चित्र घातलेले दिसत आहे. फोटोमध्ये तिने केसांचा अंबाडा घालून गजरा माळला आहे. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. ती साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. ( Marathi actress Rutuja bagwe share her saree look photos on social media)

ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते, तसेच कलाकार देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत‌ आहेत. तिच्या या फोटोवर मंजिरी ओक हिने “खूप गोड,” अशी कमेंट केली आहे, तर अश्विनी केशर हिने “आई शप्पथ” अशी कमेंट केली आहेत. यासोबत अक्षय बर्दापूरकर, सुबोध भावे यांनी देखील तिच्या या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुझी घायाळ नजर आणि मधाळ हसू. तूच सांग कसं सावरू मी स्वतःला,‌ सतत तुझा भास, तूच आसपास,” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “सौंदर्यवती,” अशी कमेंट केली आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

 

 

हे देखील वाचा