Saturday, July 6, 2024

‘माझी वेळ येईपर्यंत वाट बघा’, म्हणत ऋतुजा बागवेने शेअर केला ग्लॅमरस अंदाजातील फोटो

मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत सालस आणि सोज्वळ भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. प्रेक्षकांनी देखील तिच्या अभिनयाला दाद दिली आहे. आज तिने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती अनेकवेळा शेअर करत असते. बहुतांश वेळेस ती साडीमधील फोटो शेअर करत असते. पण यावेळेस तिने अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केला आहे.

ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या रंगाचा साईड कट ड्रेस घातला आहे. तसेच तिने सगळे केस मागे बांधले आहेत. याव्यतिरिक्त तिने हाय हील्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (Marathi actress Rutuja bagwe’s glamorous look viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने “माझी वेळ येईपर्यंत वाट बघा,” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोवर सुबोध भावेने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे, तर माधवी निमकरने “वाव,” अशी कमेंट केली आहे. यासोबत गौरी नलावडे, भक्ती रत्नपारखी, आस्ताद काळे यांनीही कमेंट केल्या आहेत. तसेच तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगाती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा