Tuesday, June 10, 2025
Home मराठी ‘अगं अगं थांब!’ ऋतुजा बागवेचा ग्लॅमरस लूक पाहून कलाकार देखील झाले ‘क्लीन बोल्ड’

‘अगं अगं थांब!’ ऋतुजा बागवेचा ग्लॅमरस लूक पाहून कलाकार देखील झाले ‘क्लीन बोल्ड’

छोट्या पडद्यावरील अत्यंत सोज्वळ आणि सालस अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने अभिनयातून तिच्या चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. ऋतुजा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकवेळा साडीमधील फोटो शेअर करत असते. ऋतुजाला नेहमी आपण पारंपारिक पोशाखात आणि साडीमध्ये पहिले आहे. तिचा पारंपारिक अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असतो. अशातच तिचा एक घायाळ करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ऋतुजाने अत्यंत ग्लॅमरस फिकट गुलाबी रंगाचा साईड कट ड्रेस घातला आहे. तसेच ड्रेसला मॅचिंग गुलाबी रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. कानात मोठे रिंग्स घातले आहेत. मिडल पार्टेशन करून केसांना एक वेगळा लूक दिला आहे. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. (marathi actress rutuja bagwe’s glamrous look viral on social media)

तिचा हा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील या फोटोवर कमेंट केला आहेत. या फोटोवर अभिनेत्री अश्विनी केसर हिने “वोहो” अशी कमेंट केली आहे. तर ऐश्वर्या नारकर यांनी “कमाल” अशी कमेंट केली आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीड याने “मार डाला” कमेंट केली आहे तर रसिका वेंगुर्लेकर हिने “अगं अगं थांब” अशी कमेंट केली आहे. तिचा हा लूक सर्वांना खूप आवडला आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा