Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे खूप चर्चेत असते. तसेच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील चर्चेत असते. खरं तर ऋतुजाचा समावेश मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत सोज्वळ अभिनेत्रींमध्ये होतो. तिचा हा सोज्वळ आणि साधेपणा तिच्याकडे पाहता क्षणीच प्रेक्षकांच्या ध्यानात येतो. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. अलीकडेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली आहे. तिने केशरी रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात ठुशी आणि कानातले घातले आहेत. कपाळी टिकली लावून तिने सगळे केस बांधलेले आहेत. तिचा हा मनमोहक फोटो तिच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकरांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोवर सुबोध भावे, सायली संजीव, पल्लवी पाटील या कलाकारांनी कमेंट केली आहे. (marathi actress rutuja bagwe’s saree photos viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “नेकी कर दरिया में डाल.” याआधी देखील तिने साडीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना तिचा हा साडीतील लूक प्रत्येक वेळेस खूप आवडला आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा