‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत.
सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने तिच्या पतीसोबतचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीतील पदराचा रंग जांभळा आहे. यासोबत तिच्या पतीने देखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोती घातली आहे. तसेच जांभळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. तिने ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. तसेच कपाळी चंद्राची कोर लावली आहे. तसेच केसात गुलाबाचे फुल घातले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्यांनी त्यांच्या बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत. (Marathi actress sai lokur share a photo with her husband)
तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. त्या दोघांची जोडी सर्वांना खूप आवडतं आहे. सईने डिसेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आजकाल सई सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील खूप खुश आहेत.
सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती, पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.
सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक










