मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्यंत तिने विविध पात्रं निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.
सईने इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच तिने केसांचा बन घातला आहे. तसेच गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. या फोटोमध्ये तिचे सौंदर्य आणि तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. (Marathi actress sai Tamhankar share her glamorous photos on social media)
तिचे चाहते या फोटोवर सातत्याने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सई अनेकवेळा तिच्या या ग्लॅमरस अंदाजात दिसत असते परंतु तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. या फोटो वर चाहते अनेक हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत.
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले असून, या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम