मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्यंत तिने पात्र निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती एका फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिच्या पोझ पाहण्याजोग्या आहेत. (Marathi actress sai Tamhankar share her video on social media)
सईने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या अनेक चाहत्यांच्या आणि अनेक कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या या व्हिडिओवर प्रार्थना बेहेरेने “परम सुंदरी” अशी कमेंट केली आहे. तसेच सारंग साठे, जितेंद्र जोशी अमृता खानविलकर यांनी देखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…