मराठी सिनेसृष्टीतील टाॅप अभिनेत्रींपैकी एक सई ताम्हणकर आहे. सईने तिच्या अभिनयाच्या बळावर स्वत:ला सिध्द केले. सईने केवळ मराठीत नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप साेडली. सई तिच्या कामासाेबतच तिच्या फॅशन स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. साेशल मीडियावर नियमित सक्रिय राहून सईला तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करायला आवडते. अशातच सईने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, जे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करून अभिनेत्रीवर काैतुकाचा वर्षाव करत आहेत.
सई ताम्हकर (sai tamhankar) नेहमीच स्वतःवर विविध लूक ट्राय करत असते. ती तिचा प्रत्येक लूक अतिशय चांगल्या पद्धतीने कॅरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा सई तिच्या अश्याच दमदार लूकमुळे चर्चेत आली आहे. सईने रंगीबेरंगी साडी नेसली असून केसांमध्ये गजरा माळला आहे, जाे तिच्या साैंदर्यात चार चांद लावत आहेत. सईने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “सालस”
सईच्या फाेटाेंवर चाहत्यांनी केला काैतुकाचा वर्षाव
सईला साडीमध्ये पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत म्हणटले की, सई खूप छान’, तर अजून एका चाहत्याने, ‘तू साडीमध्ये अगदी सुंदर दिसते’ असे म्हणत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अशात एका चाहत्याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत म्हटले की, ‘सालसा म्हणजे काय?’
View this post on Instagram
सई ताम्हणकर हिच्या अभिनय कारकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘गर्लफ्रेंड’, ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘मिमी’, ‘प्यार वाली लव्ह स्टाेरी’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (marathi actress sai tamhankar share photos wear saree )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?