मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारी संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीत मागणी असणारी अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो, तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने साकारल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
संस्कृतीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सोनेरी रंगाची प्लेन साडी नेसली आहे. यावर तिने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात सुंदर असा नेकलेस आणि मॅचिंग ईअरिंग घातले आहेत. सोबतच केसांचा अंबाडा घातला आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच तिचा मेकअप देखील खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress sanskruti balgude share her golden saree photos on social media)
हे फोटो शेअर करून तिने “सुनहरा रूप,” असे कॅप्शन दिले आहे. अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “मराठी सिनेमा सृष्टीतील सौंदर्याचे अप्रतिम रूप,” तर आणखी एका चाहत्याने “गोल्डन परी,” असे लिहिले आहे.
संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती.
लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के हे कलाकार दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक