Tuesday, July 9, 2024

संस्कृती बालगुडे दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; लवकरच ‘हा’ रियॅलिटी शो होस्ट करणार अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण आजवर आपण कोणीच तिला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहिले नव्हते. अनेक अभिनेत्रींनी सूत्रसंचालन केले आहे. पण आता संस्कृती लवकरच प्रेक्षकांना नवीन रूपात म्हणजे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या दिवसात टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका सुरु होणार आहे. यातच स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवा कोरा रियॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर एक डान्सिंग रियॅलिटी शो येणार आहे. या शोचे नाव ‘मी होणार सुपरस्टार… जल्लोष डान्सचा’ हे आहे. या शोचे प्रोमो मागील अनेक दिवसापासून दाखवले जात आहेत. या शोमध्ये अभिनेता अंकुश चौधरी देखील दिसणार आहे. पण तो परीक्षकाच्या भूमिकेत असेल की, सूत्रसंचालकाच्या हे अजूनही स्पष्ट झाले नाही. त्याने या शोचा प्रोमो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर केला होता.

त्यामुळे आता या शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच ही माहिती समोर आली आहे की, या शोमध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर संस्कृतीचा लाल रंगाच्या ड्रेसमधील एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती ‘मी होणार सुपर डान्सर’ या शोचे सूत्रसंचालन करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता तिचे चाहते तिला एक वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. हा शो २१ ऑगस्टपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (marathi actress sanskruti balgude will host mi honar superstar.. jallosh dancecha show)

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा