Saturday, July 6, 2024

काळजाचा ठोका चुकला ना राव! संस्कृती बालगुडेचे ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटो पाहून चाहते झाले घायाळ

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती, आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो, तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा वावर वाढला आहे. अशातच तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

संस्कृतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, संस्कृतीने काळ्या रंगाचा एक बॅकलेस आणि साईड कट असलेला अत्यंत ग्लॅमरस ड्रेस परिधान केला आहे. तिने तिचे सगळे केस मागे बांधले आहेत आणि ड्रेसला साजेसे असे कानातले घातले आहेत. एकंदरीत या फोटोमध्ये ती फार सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. (Marathi actress sanskruti balgude’s photo viral on social media)

संस्कृतीने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तिचे चाहते नेहमीप्रमाणे या फोटोवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिच्या एका चाहत्याने या‌‌ फोटोवर “मी तर घायाळ झालो” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहत्यांच्या देखील या फोटोवर प्रतिक्रिया येत आहेत.

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा