संस्कृती बालगुडेने शेअर केले भुरळ पाडणारे मराठमोळे फोटो, तर पेशवाई नथीवर खिळल्या लाखो नजरा


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि लोकांना त्यांच्याबद्दल माहिती होण्याआधीच त्या चित्रपटातून दूर गेलेल्या असतात. पण येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे हे अगदी निवडक अभिनेत्रींना जमते. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. संस्कृतीने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अवघडातली अवघड भूमिका संस्कृती अगदी सहजतेने पार पाडते. अतिशय निवडक चित्रपट आणि त्यातला उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान मिळवले आहे. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते. संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. 

संस्कृतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही मराठमोळे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने मोरपंखी रंगाची पैठणी परिधान केली आहे. तसेच तिने डिझायनर लाल रंगाचा ब्लाउज घातला आहे. शिवाय नाकात पेशवाई नथ आणि कपाळी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिने तिचे सगळे केस बांधले आहेत.

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे.” तर दुसऱ्या फोटोला “….उसवून श्वास माझा फसवून रात गेली…”असे निराळे पण लक्षवेधी कॅप्शन तिने दिले आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा फोटो पाहून सगळेजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

संस्कृती ही मराठी चित्रपट सृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.